रत्नागिरी : गणेशोत्सवानिमित्त कोकणात येणाऱ्या प्रवाशांच्या तिकीट बुकिंग संदर्भात सध्या अनेक तक्रारी आहेत. तिकीट बुकिंग सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत बुकिंग फुल कसं काय होतं, असा सवाल नागरिक विचारत आहेत. अशा अनेक प्रश्नांसंदर्भात रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव विनायक राऊत हे गुरुवार दि.२५ मे २०२३ रोजी कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांची भेट घेणार आहेत. तरी ज्या प्रवाशांकडे अधिकची माहिती असेल, त्यांनी कृपया vinayakbraut@gmail.com या ईमेल आयडी वर पाठवावी, असं आवाहन खासदार विनायक राऊत यांच्या कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.