रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषद(कोमसाप) आणि महाराष्ट्र साहित्य परिषद(मसाप) यांच्यामधील समेट अद्यापतरी होणे अशक्य आहे, असे कोमसापचे संस्थापक मधुमंगेश कर्णिक यांनी स्पष्ट केले. ते रत्नागिरीमध्ये बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त कोमसाप आणि मसाप यांच्यात समेट होईल, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु, कर्णिक यांच्या स्पष्टीकरणामुळे समेटाची शक्यता मावळली आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद यांनी सहसंस्था म्हणून आम्हाला प्रस्ताव दिल्याची खोटी बातमी पसरवली गेली, असा आरोप कर्णिक यांनी केला आहे. आम्ही मराठी साहित्य परिषदेचे सहयोगी नाही, मात्र अखिल भारतीय साहित्य अकादमीचे सहयोगी असल्याच्या वृत्ताला मात्र त्यांनी दुजोरा दिला. साहित्य अकादमीसोबत भविष्यात कार्यक्रम करू, असेही ते म्हणाले. त्यामुळे भविष्यात कोमसाप आणि मसाप यांच्यामधील वाद सुरुच राहणार आहे.