मुंबई, (निसार अली) : कोळी महासंघाच्या पॉलिटब्यूरोची सभा नेरुळच्या नामदेव भगत हायस्कूलमध्ये झाली. यावेळी जुनी कार्यकारिणी बरखास्त करुन नविन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. नामदेव रामा भगत यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष डॉ.गजेन्द्र भांजी, उपाध्यक्ष चंदू पाटील आणि रविकांत परिकर, सरचिटणीस सुनील नारायण कोळी, उपसरचिटणीसपदी विजय वरळीकर व विजय आवसरकर, खजिनदार विश्वनाथ कोळी, सल्लागार दामोदर तांडेल व रामभाऊ पाटील यांची यांची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीत महासंघाला मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्रातील विविध छोट्या मोठ्या कोळी संघटनांनी एकत्र येण्याची सुरुवात महासंघाच्या माध्यमातून झाली आहे. गाव-तालुका पातळीवर समाजाला जोडण्याची गरज आहे, त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कोळी महासंघाकडून सांगण्यात आले. या सभेला राज्याभरातून कोळी बांधव एकत्र आले होते.