रत्नागिरी : मध्य भारतातून येणारे कोरडे वारे थेट महाराष्ट्राच्या किनाऱ्यापर्यत येवून ठेपल्याने कोकणात पारा वाढला आहे. याचा फटका आंबा पिकाला बसण्याची शक्यता आहे. तसेच उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असल्याने घराबाहेर पडणेही अशक्य झाले आहे.
या कोरड्या वार्यांना पश्चिमेकडून वाहणारे वारे रोखतात. मात्र, हे वारे वाहणे मंदावल्याने कोरडे वारे वाहत आहेत, परिणामी उष्णतेची लाट निर्माण व्हावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
तापमानात ६ ते ८ अंशांनी वाढ झाली आहे. ते ३९ ते ४२ वर पोहचले आहे. इराणकडून वाहणारे पश्चिमेकडील वाऱ्यांचा जोर कमी झाला आहे. समुद्राकडील थंड हवा कोकणाच्या जमिनीच्या दिशेने जाण्याची प्रकिया थांबली आहे. कोकणातली हवेतील आर्दता अर्थात दमटपणा कमी झाला आहे, अशी माहिती भुगर्भीय तज्ञ प्रा. डाँ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी दिली.
आंबा पिकाला फटका
तापमानाचा उंच्चांक कोकणात नोंदवला जात आहे. उष्णतेच्या परिणाम आंब्यावर होऊन गळ होवू शकते, अशी भिती कृषी तज्ञ आणि कोकण कृषी विद्यापिठचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी व्यक्त केली.