Kalyan : कोकण इतिहास परिषद गेली अकरा वर्षे पालघर पासून गोव्या पर्यंत पसरलेल्या कोकणात इतिहास संवर्धन व संशोधनाचे कार्य करीत आहे. संशोधनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम कोकण इतिहास परिषद आयोजित करीत असते, त्याचाच एक भाग म्हणून परिषद दरवर्षी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करत असते.यावर्षी रविवार दि २४ ऑक्टोबर २०२१ रोजी. सकाळी ९.३०ते सायं ५ पर्यंत बी. के. बिर्ला महाविद्यालय कल्याण, ठाणे येथे ऑनलाईन अकरावे “एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटन सत्रात प्रमुख पाहुणे डॉ.राजेश नार्वेकर(जिल्हाधिकारी, ठाणे)असणार आहेत, तर उद्घाटन डॉ नरेश चंद्र (संचालक, बी. के. बिर्ला महाविद्यालय, कल्याण), सदाशिव टेटविलकर (अध्यक्ष: कोकण इतिहास परिषद) डॉ. वर्षा शिरगावकर (माजी इतिहास विभाग प्रमुख, एस. एन. डी. टी. विद्यापीठ, मुंबई),आदी यांचे प्रास्ताविक ,मार्गदर्शन असणार आहे.
पहिले सत्र सकाळी १० वा सुरु होईल दरवर्षी कोकण इतिहास परिषद कोकणचा इतिहास व पुरातत्व विषयात महत्वाचे संशोधन कार्य करणाऱ्या ज्येष्ठ संशोधकांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करत असते यावर्षी हा मानाचा जीवनगौरव पुरस्कार मंदिर स्थापत्य व कला या विषयात प्रचंड संशोधन केलेले .प्राच्यविद्या विभूषित डॉ. कुमिदिनी कानिटकर यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
दुसऱ्या विभागीय सत्रात सकाळी ११.ते सायं. ५.वा या मध्ये प्राचीन विभाग डॉ. अनुराधा रानडे, मध्ययुगीन विभाग डॉ. मोहसीना मुकादम.आधुनिक विभाग डॉ. मेहेरज्योती सांगळे मार्गदर्शन करणार आहेत.
ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या परिषदेत कोकणच्या प्राचीन काळापासून अर्वाचीन काळापर्यंत झालेल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, सागरी, ऐतिहासिक, आर्थिक शैक्षणिक इतिहासावर आधारीत विषयावर तसेच कोविड १९ या समकालीन महत्वाच्या विषयावर मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेमध्ये प्राध्यापक इतिहास अभ्यासक तसेच पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी आपले शोध निबंध सादर करणार आहेत.
तसेच दरवर्षी कोकणच्या इतिहासावर आधारीत असणाऱ्या संशोधन ग्रंथाला पुरस्काराने गौरविण्यात येते. परिषदेत सादर होणाऱ्या शोधपत्रिकेत उत्कृष्ट शोधनिबंध लिहिणाऱ्या संशोधकाला पुरस्कार देण्यात येतो. शिवाय शोधनिबंध ग्रंथाचे प्रकाशन, कोकण इतिहास पत्रिकेचे प्रकाशन आणि मान्यवर इतिहास लेखकांचे पुस्तक प्रकाशन परिषद करीत असते.
असे निमंत्रण डॉ. अविनाश पाटील प्राचार्य बी. के. बिर्ला महाविद्यालय, कल्याण.डॉ. श्रीनिवास वेदक उपाध्यक्ष, कोकण इतिहास परिषद,डॉ. स्वप्ना समेळ,स्थानिक संयोजक, इतिहास विभाग प्रमुख,उपप्राचार्या, कलाशाखा,बी. के. बिर्ला महाविद्यालय, कल्याण,डॉ. विद्या प्रभू सचिव, कोकण इतिहास परिषद,प्रा. जीतेंद्र भामरे,परिषद समन्वयक, अध्यक्ष,कोकण इतिहास परिषद, कल्याण शाखा यांनी केले आहे.
तरी इच्छुक व्यक्तींनी डॉ. विद्या प्रभु कोकण इतिहास परिषद भ्रमणध्वनी ९८२०२७७७३७ व प्रा. जितेंद्र भामरे भ्रमणध्वनी ९६१९७०१७२८ अध्यक्ष कल्याण शाखा कोकण इतिहास परिषद यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष सदाशिव टेटविलकर, बी. के. बिर्ला कॉलेजचे संचालक डॉ. नरेश चंद्रा, प्राचार्य डॉ. अविनाश पाटील व डॉ. स्वप्ना समेळ संयोजक राष्ट्रीय परिषद यांनी केला आहे.संपर्क 9769428306 असे आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे














