मुंबई : नाईट फ्रँक इंडिया या एका आघाडीच्या इंटरनॅशनल प्रॉपर्टी कन्सल्टंट्सने एका दिग्गज व्यक्तीचा समावेश आपल्या नेतृत्वामध्ये केला आहे. अरविंद नंदन यांनी नाईट फ्रँक इंडियाचे संशोधन–कार्यकारी संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे आणि ते भारतात नाईट फ्रँकचे संशोधनातील नेतृत्व अधिक सक्षम करण्यासाठी योगदान देणार आहेत. अंदाजे दशकभर संशोधन कार्याची धुरा सांभाळणारे डॉ. सामंतक दास यांनी नाईट फ्रँक इंडिया सोडायचे ठरवले आहे.
अरविंद यांना संशोधन, धोरण, विश्लेषण, सल्ला, मूल्यांकन, गुंतवणूक व विकास विश्लेषण या क्षेत्रांतील नेतृत्व व व्यवस्थापन कौशल्य यांचा अंदाजे दोन दशकांचा अनुभव आहे. नाईट फ्रँक इंडियामध्ये रुजू होण्यापूर्वी, अरविंद हेड – प्रॉपर्टी कन्सल्टिंग (सोभा एलएलसी, दुबई) येथे कार्यरत होते. त्यापूर्वी, त्यांनी कॉलिअर्स इंटरनॅसनल, लियासिस फोरास, हौसिंग.कॉम, कुशमन अँड वेकफिल्ड आणि जोन्स लाँग लासेल येथे नेतृत्व केले आहे.
नाईट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी सांगितले, ‘’नाईट फ्रँक गेली दोन दशके सखोल विश्लेषणाद्वारे या उद्योगाला सातत्याने सेवा देत आहे. रिअल्टी रिसर्चचे भवितव्य यापुढील काळात योग्य प्रकारे अंदाजे वर्तवणे, दूरगामी धोरणे व बाजारात कार्यरत असलेल्यांच्या निर्णयक्षमतांपुढील समस्यांवर कटाक्षाने भर, अशा क्रांतीकारी मॉडेलवर अवलंबून असणार आहे, असे आमचे मत आहे. अरविंद यांचा समावेश झाल्याने, त्यांना व्यवसायाच्या कार्यपद्धतीमध्ये असलेला समृद्ध अनुभव, तसेच संशोधनाचे आकलन व पॅशन आमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे.”
अरविंद नंदन यांनी नमूद केले, “या नव्या कारकिर्दीला सुरुवात करणे म्हणजे नाईट फ्रँक इंडियाच्या प्रस्थापित संशोधनामध्ये आणखी वाढ करण्याची सुवर्णसंधी आहे.रिअल्टी क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वांना सेवा देईल, असा सखोल विचार करण्यासाठी आणि विशिष्ट संशोधनावर भर देण्यासाठी, माझ्यासाठी ही मोलाची संधी आहे. डॉट-कॉमची लाट येऊन दोन दशके झाल्यावर व भारतातील रिअल इस्टेट उद्योगातील पहिल्या रचनात्मक परिवर्तनानंतर, आता आपल्या ज्ञानाद्वारे परिवर्तनाची नवी लाट आणण्याची वेळ आली आहे, असे दिसते. “