कळंबोली :अभ्यास भेट विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देतात ज्यामुळे प्रभावी शिक्षण मिळते. 19 नोव्हेंबर रोजी के.एल.ई. सोसायटीचे सायन्स आणि कॉमर्स महाविद्यालय, कळंबोली (नवी मुंबई) येथील गणित विभागातर्फे 34 विद्यार्थ्यांनी नेहरू विज्ञान केंद्र, वरळी येथे भेट दिली. गणित विभागाचे विभागप्रमुख सहाय्यक प्रा. तनुश्री पाटील, सहाय्यक प्रा. आकांक्षा थळी, सहाय्यक प्रा. पूनम म्हस्के आणि सहाय्यक. प्रा. मंदार ठाकूर या शिक्षकांनी अभ्यास भेटीचे संयोजन केले. तेथे विद्यार्थ्यांनी थ्रीडी शो, सायन्स ऑन स्फेअर शो आणि सायन्स ओडिसी चित्रपट पाहिला. त्यांनी लाइट आणि साइट गॅलरी, हॉल ऑफ न्यूक्लियर पॉवर, हॉल ऑफ एव्हिएशन आणि स्पेस, मिरर गॅलरी, तंत्रज्ञान हेरिटेज गॅलरी इत्यादींची याचि देही याचि डोळे अनुभव घेतला. विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यास भेट एक समृद्ध आणि मनोरंजक शिकण्याचा अनुभव होता. मल्लाप्पा होटागोंडा या विद्यार्थ्याने प्रातिनिधिकपणे मत व्यक्त केले, “हा एक चांगला अनुभव होता. मी प्रागैतिहासिक जीवन आणि विमान वाहतुकीतील तांत्रिक प्रगतीबद्दल खूप शिकलो.” ही अभ्यास भेट खरोखरच सर्व बाबींनी परिपूर्ण होती आणि विद्यार्थ्यांना अशा आकर्षक आणि माहितीपूर्ण ठिकाणी भेट देण्याची संधी मिळाल्याबद्दल विद्यार्थी व शिक्षकांनी प्राचार्य डॉ.जी.डी.गिरी यांचे आभार मानले.