कळंबोली: मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या ५५ व्या आंतर-महाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या भारतीय लोकनृत्याच्या अंतिम फेरीत कळंबोलीच्या KLE महाविद्यालयाने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. ६२ महाविद्यालये सहभागी झाले होते.
आसामचे लोकप्रिय लोकनृत्य ‘मीच कसारी’ यावर केएलईच्या विद्यार्थ्यांनी नृत्य केले, अशी माहिती सांस्कृतिक समितीच्या प्रभारी ( co-ordinator) सहाय्यक प्रा. प्रिती यमदागिनी यांनी दिली. प्राचार्य डॉ. जी.डी.गिरी, सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात कामगिरी करणाऱ्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.