कळंबोली : येथील विविध परिसरमध्ये के.एल.ई. कॉलेजच्या FC – EVS विभागातर्फे घरगुती हिंसाचार, अंमली पदार्थांचे व्यसन, मानवाधिकार आणि संविधानातील मुलभूत अधिकार, अशा अनेक विषयांवर जनजागृती अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. FC – EVS विभागप्रमुख आणि सहाय्यक प्राध्यापक मिलिंद गुरचल यांच्या मार्गदर्शनखाली तब्बल २५ विद्यार्थ्यांनी अनेक सामाजिक विषयांवर आयोजित जनजागृती मोहिमेत सहभाग घेतला. के.एल.ई. कॉलेजचे प्राचार्य डॉ. जी.डी. गिरी यांनी FC – EVS विभागाच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
अशा विविध कार्यक्रमातुन के.एल.ई. महाविद्यालय स्थानिक परीसरामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.