
नवी दिल्ली : 2 ते 6 नोव्हेंबर 2022 दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजिलेल्या दुसरी इंडियन ओपन आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत हौशी किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन (पनवेल) मधून ४ खेळाडूंनी भाग घेतला आणि विविध पदके जिंकली. सौम्या पिंपळे – 2 सुवर्ण पदक, रुग्वेद जेधे – सुवर्ण आणि कांस्य पदक, के.एल.ई. कॉलेज TYBCOM विद्यार्थी केदार खांबे – कांस्य पदक आणि अस्मी गुरव – सुवर्ण पदक अशी विविध पदके पटकवली.
या चॅम्पियनशिपसाठी खेळाडूंना तयार करण्यासाठी *
प्रशिक्षक प्रदीप मैलागीर यांनी जास्तीत जास्त प्रयत्न केले. प्राचार्य डॉ.जी.डी.गिरी व सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी विजेत्यांचे कौतुक केले.