कळंबोली: के.एल.ई. कॉलेजच्या एस्पेरांतो वार्षिक कार्यक्रमात ‘सरला एक कोटी’ चित्रपटाचे ओंकार भोजने (महाराष्ट्राची हस्या जत्रा फेम) आणि ईशा केसकर (उर्फ शनाया) हे कलाकार 28 जानेवारीला येणार आहेत.
या युवा महोत्सवात सांस्कृतिक समितीने गायन, नृत्य, स्कीट इत्यादी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यंदाच्या एस्पेरेंटोची थीम महाराष्ट्राची लोकधारा आहे. त्यामुळे लावणी, गोंधळ, कोळी यांसारखे थीमॅटिक नृत्य सादरीकरण विद्यार्थी आणि कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्यांचे नक्कीच लक्ष वेधून घेतील.
कार्यक्रमास 2000 हून अधिक विद्यार्थी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे,
प्राचार्य डॉ. जी.डी.गिरी आणि सांस्कृतिक समन्वयक प्रिती यमदग्नी यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी स्वयंसेवक एस्पेरांतोच्या सर्वोत्तम यशासाठी तयारी करत आहेत.