

कॉमर्स फेस्ट हा व्यवसाय धोरण, ई-कॉमर्स आणि सांस्कृतिक उपक्रमांवर आधारित होता. शालेय स्तर आणि महाविद्यालयीन स्तर अशा दोन श्रेणींमध्ये चार स्पर्धा घेण्यात आल्या. वक्तृत्व स्पर्धा, एक्सटेम्पोर, अॅड-मॅड शो, टी-शर्ट आणि फेस पेंटिंग.
नवी मुंबई आणि रायगड येथील विविध शाळा आणि महाविद्यालयातील इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या सर्व स्पर्धकांनी आपापल्या शिक्षकांसह नाविन्यपूर्ण कलागुणांचे प्रदर्शन केले.
विजेते :आंतरमहाविद्यालयीन स्तरावर):
वक्तृत्व स्पर्धा — कु. सैफ शेख, रामशेठ ठाकूर जे.आर. कॉलेज, खारघर, एक्सटेम्पोर — कु.संजना सिसोदिया, रामशेठ ठाकूर जे.आर. कॉलेज, खारघर, अॅड-मॅड शो — गट क्रमांक-01, रामशेठ ठाकूर जे.आर. कॉलेज, खारघर,
टी-शर्ट पेंटिंग आणि फेस पेंटिंग — कु. गौरव भाटी, केएलई कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, कळंबोली.
विजेते (आंतरशालेय स्तरावर):
वक्तृत्व स्पर्धा– कु. खुशनुमा खान, प्रेश इंग्लिश अँड मराठी मिडीयम स्कूल, रोडपाली.
एक्सटेम्पोर — कु. साहिल शर्मा, प्रार्थना इंग्लिश अँड मराठी मिडीयम स्कूल, रोडपाली. अॅड-मॅड शो गट क्रमांक-01, प्रार्थना इंग्लिश व मराठी माध्यम शाळा, रोडपाली.
टी-शर्ट पेंटिंग आणि फेस पेंटिंग– कु.अंकिता यादव आणि कु. रिद्धी सिंग (गटात) आणि कु. श्रेया राम (वैयक्तिकरित्या).
केएलई कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, लेख वर्मा (वाणिज्य समन्वयक), शिक्षिका संध्या खरे आणि कनिष्ठ महाविद्यालयातील इतर सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी हा कॉमर्स फेस्ट यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले.