कळंबोली : के.एल.ई. कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सच्या BAMMC विभागातर्फे 31 मार्च रोजी ‘मीडिया स्क्रम’ हा युवा महोत्सव यशस्वी आणि उत्साही आयोजित करण्यात आला.
‘अनि-मॅनिया’ ही यंदाच्या फेस्टची थीम होती. या फेस्टमध्ये पीआर फाईट, ट्रेझर हंट, फॅशन शो, फोटोग्राफी, प्रोडक्ट रील, जॅम, रॅपलिंग आणि बीट बॉक्सिंग अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. के.एल.ई. कॉलेजच्या BAMMC विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या मीडिया स्क्रॅममध्ये नारायण गुरु कॉलेज, बंट्स संघ कॉलेज, सत्याग्रह कॉलेज, SIWS कॉलेज, अण्णा लिला महाविद्यालय, आचार्य-मराठे महाविद्यालय आणि पिल्लईच्या रसायनी कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विद्यार्थी समन्वयक तुलसी भारद्वाज, अजय मौर्या आणि शिवांगी वर्मा यांनी केले.
हा फेस्ट यशस्वी करण्यासाठी सर्व BAMMC विद्यार्थी जास्तीत जास्त मेहनत घेतली. अँकर चंद्रिमा डे आणि अदिती कनोजिया यांनी कार्यक्रमाची सुरुवात जपानी भाषेतून केली आणि अशा प्रकारे कार्यक्रम प्रभावीपणे सांभाळला. सहाय्यक प्राध्यापिका क्षमता चव्हाण, सहायक प्राध्यापक प्रमोद गायकवाड, सहायक प्राध्यापिका मोनिका रयाल आणि विभागप्रमुख सहाय्यक प्राध्यापिका
दिपाली कदम यांनी कार्यक्रमाचे नेतृत्व करण्यात मोलाची भूमिका बजावली. प्रभारी प्राचार्य डॉ. उषा करुणाकरन आणि उपप्राचार्य डॉ. सुमंत सोवनी यांनी माध्यमांच्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या क्रिएटिव्ह प्रोग्रामिंग शैलीचे कौतुक केले.
प्रत्येक कार्यक्रमाचे विजेते पुढीलप्रमाणे होते.
इव्हेंट 1 : जनसंपर्क लढा (PR fight):
प्रथम पारितोषिक – आचार्य- मराठे महाविद्यालय, चेंबूर
द्वितीय पारितोषिक – श्री नारायण गुरु महाविद्यालय, चेंबूर
इव्हेंट 2 : उत्पादन रील (Product Reel)
प्रथम पारितोषिक – राज (आचार्य- मराठे महाविद्यालय, चेंबूर)
द्वितीय पारितोषिक – अजय मौर्य (K.L.E. कॉलेज, कळंबोली)
इव्हेंट 3 : फोटोग्राफी
प्रथम पारितोषिक – विराज धुमाळ (पिल्लई रसायनी महाविद्यालय)
द्वितीय पारितोषिक – तन्मय भोजने (श्री नारायण गुरु महाविद्यालय, चेंबूर)
इव्हेंट 4 : JAM
प्रथम पारितोषिक – उत्कर्ष आल्टे (आचार्य- मराठे महाविद्यालय, चेंबूर)
द्वितीय पारितोषिक – जीत मवाणी (K.L.E. कॉलेज, कळंबोली)
इव्हेंट 5 : रॅपिंग आणि बीट बॉक्सिंग
प्रथम पारितोषिक – धीरज सिंग (K.L.E. कॉलेज, कळंबोली)
प्रथम पारितोषिक – खुशी त्रिवेदी (आचार्य- मराठे महाविद्यालय, चेंबूर)
द्वितीय पारितोषिक – आशिष मुथुरामन (SIWS कॉलेज)