मुंबई (राजेंद्र साळसकर) : लोकप्रिय गायक स्वर्गीय किशोर कुमार यांच्या ९५ व्या जयंती निमित्त शनिवार दिनांक १० ऑगष्ट रोजी माटुंगा येथील यशवंत नाटयमंदिरात रात्रौ ठिक ८.३० वाजता मेघ मल्हार व स्वरसा इव्हेंटस् प्रस्तुत “अगर तुम ना होते” हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे….
मेघ मल्हार ह्या संस्थे तर्फे गेली 9 वर्षे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत होता….
ह्या कार्यक्रमात आजचे आघाडीचे जितेंद्र भुरूक , आणि मोना कामत आपली कला सादर करणार आहेत. ह्या कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रशांत लळीत हे करणार आहेत व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार खराडे हे करणार आहेत. तसेच ह्या संपुर्ण कार्यक्रमाचे आयोजन तबलावादक स्वप्निल पंडित हे करणार आहेत.
अधीक माहीती साठी संपर्क:9869014524/ 9769524288