रत्नागिरी (आरकेजी): सोशल मिडीच्या आहारी गेलेली आजची युवा पिढी स्वत:लाच विसरत चालली आहे. या पीढीला आणि आजच्या मुलांना आपल्या इतिहासाठी आठवण व माहिती करुन देण्यासाठी सावंत-देसाई बंधू आणि मित्र परिवाराने किल्ले तयार करुन इतिहास जागवण्याचा प्रयत्न रत्नागिरीत केला जात आहे. रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथील छत्रपती नगर येथे सुवर्णदुर्ग किल्ल्याची भव्य प्रतिकृती साकारली आहे. माती आणि दगडांपासून तयार केलेला हा किल्ला अनेकांचं आकर्षण ठरतो आहे. बच्चे कंपनीसाठी तर धमालच, हा किल्ला पाहण्यासाठी अनेकांची गर्दी होत आहे. केलेला उपक्रम खरोखरच स्तूत्यच म्हणावा लागेल
दिवाळी म्हणजे आनंददायी सण व बच्चेकंपनीसाठी किल्ले करण्याचा उत्सव. शिवकालीन किल्ले इतिहासाची साक्ष देतात..आणि हा इतिहास किल्ल्याच्या माध्यमातून जावंत करण्याचा प्रयत्न रत्नागिरीत करण्यात येत आहे. रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथील येथील छत्रपती नगर येथे गौरव सावंत बंधू आणि मित्रपरिवाराने सुवर्णदुर्ग किल्ल्याची भव्यदिव्य प्रतिकृती साकारली आहे. या किल्ल्यावर कान्होजी आंग्रे यांची कुलदेवता कालंबिका देवी मंदिर, राजवाडा विहीर, धान्यकोठर, दारू कोठार, शिवरायांची मूर्ती, खोल खड्डा, चोर दरवाजा, चौथरा, तलाव, उध्वस्त वास्तू टाक, महादरवाजा, भिंतीत कोरलेली हनुमानाची मूर्ती, प्रवेश द्वाराच्या पायरीवर कोरलेले कासव, वाळूच्या पुळव्यामध्ये असणाऱ्या तोफा अशी पूर्ण या किल्ल्यावर साकारण्यात आलं आहे.
किल्ल्यांचे आकर्षण वाटण्यासाठी आणि इतिहासाठी माहीती या नव्या पिढीला व्हावी हा यांचा प्रयत्न आहे. गड किल्ले पाहून छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण होते. किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव…. 15 दिवसांच्या अथक प्रयत्नातून हा सुवर्णदुर्ग साकारण्यात आला आहे. दगड, माती, गोणपाट अशा विविध वस्तूंचा वापर करत 25 फूट लांब, 15.फुट रुंद आणि 3 फुट उंचीचा हा किल्ला साकारला गेला आहे. अतिशय सुंदर असणा-या किल्ल्याला रत्नागिरीसह इतर भागातील शिवप्रेमी आवर्जून भेट देत आहेत.