
मुंबई, ५ ऑगस्ट २०२६: किया इंडिया या देशातील अग्रगण्य मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने आज आपली पहिली हायब्रिड एसयूव्ही ऑल-न्यू सोरेंटोची पहिली झलक दाखवली. ही जागतिक स्तरावर प्रशंसित प्रीमियम फ्लॅगशिप एसयूव्ही लवकरच भारतात दाखल होणार असल्याचा संकेत आहे. उत्कृष्ट डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान आणि प्रीमियम एसयूव्ही अनुभवासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रसिद्ध असलेली ऑल-न्यू सोरेंटो कियाचा जागतिक उत्पादन पोर्टफोलिओ भारतातील ग्राहकांसाठी आणण्याच्या कटिबद्धतेला सादर करते.
किया आपला प्रीमियम एसयूव्ही पोर्टफोलिओ प्रबळ करणे सुरू ठेवत असताना ऑल-न्यू सोरेंटोचे भारतातील पदार्पण त्या प्रवासातील पुढील आपसूक पाऊल आहे. आकर्षक डिझाइन, सर्वोत्तम नाविन्यता आणि अपवादात्मक वैविध्यता यांना एकत्र आणून ही एसयूव्ही या श्रेणीतील अपेक्षांना नव्या उंचीवर घेऊन जाण्यास सज्ज आहे. २००२ मधील जागतिक पदार्पणापासून, सोरेंटो कियाच्या सर्वात यशस्वी वेईकल बनली आहे, जिने चार पिढ्यांचा टप्पा पार केला आहे आणि १३२ देशांमध्ये ४.८ दशलक्षाहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. २०२४ आणि २०२५ मध्ये जागतिक स्तरावर कियाच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पहिल्या तीन मॉडेल्समध्ये या वेईकलने सातत्याने स्थान मिळवले आहे. तसेच या वेईकलला आयआयएचएस टॉप सेफ्टी पिक+, ५-स्टार एनएचटीएसए सेफ्टी रेटिंग आणि कार अँड ड्रायव्हर्स एडिटर्स चॉईस अवॉर्ड यांसारख्या बहुमानांनी सन्मानित करण्यात आले आहे. सुरक्षा, गुणवत्ता आणि चिरंतन जागतिक आकर्षणाचा हाच वारसा घेऊन कियाची ही प्रीमियम फ्लॅगशिप एसयूव्ही आता आजवरच्या सर्वात प्रगत आणि सक्षम आवृत्तीमध्ये भारतात येत आहे, ज्याच्या केंद्रस्थानी कियाचे नवीनतम तंत्रज्ञान आणि नाविन्यता आहेत.
ऑल-न्यू सोरेंटो भारतात दाखल झालेली नसताना देखील आपले अस्तित्व जाणवून देते. हा टीझर स्पष्ट शोल्डर लाईनसह उंच, अपराइट सिल्हूट आणि रुंद, आकर्षक स्टान्स (पवित्रा) दर्शवतो, जी रस्त्यावरील प्रभावी उपस्थिती आणि वैविध्यतता या दोन्हीसाठी तयार केलेल्या उद्देशपूर्ण कौटुंबिक एसयूव्हीला दाखवते. समोरच्या बाजूला आकर्षक प्रकाशित लाईटिंग ग्राफिक बोनेटवर ठळक, कोनीय मार्ग तयार करते, जे बंपरवर खालील बाजूला असलेल्या दुय्यम लाईटिंग क्लस्टरशी जोडलेले आहे. हे भारतातील मॉडेलसाठी विशिष्ट दोन-स्तरीय लाईटिंग सिग्नेचर सादर करते.
एकत्रितपणे, हे डिझाइन संकेत ऑल-न्यू सोरेंटो किया इंडियाच्या एसयूव्ही श्रेणीमध्ये आणत असलेल्या भव्यतेची आणि उपस्थितीची जाणीव करून देतात. भारतातील ग्राहकांच्या पसंतीस उतरण्याच्या सोरेंटोच्या क्षमतेवर किया इंडियाचा असलेला विश्वास यातून दिसून येतो. भारतात अधिकृत लाँचपूर्वी, इच्छुक ग्राहक त्यांच्या जवळच्या किया इंडिया डीलरशिपला भेट देऊन किंवा किया इंडियाच्या वेबसाइटला कियाडॉटकॉम भेट देऊन ऑल-न्यू सोरेंटो प्री-बुक करू शकतात.
कियाच्या ‘मूव्हमेंट दॅट इन्स्पायर्स’ या जागतिक वचनाशी बांधील राहत ऑल-न्यू सोरेंटो तोच उत्साह भारतात घेऊन येत आहे. किया इंडिया प्रीमियम एसयूव्ही गतिशीलतेमध्ये नवीन मापदंड जोडण्यासाठी सज्ज होत असताना ऑल-न्यू सोरेंटोबद्दल पुढील माहिती योग्य वेळी जाहीर केली जाईल.














