मुंबई : 53 वी पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा 26 ते 30 डिसेंबर 2019 या कालावधीत अलोन पब्लिक स्कूल, बेमेतारा, छत्तीसगड येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रामध्ये सोलापूर येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेतून पुरुषांचा व महिलांचा संघ निवडण्यात आला असून त्याची घोषणा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव संदिप तावडे यांनी पुरुष व महिला संघाची केली.
पुरुष संघ:
अक्षय भांगरे (कर्णधार), ऋषिकेश मुर्चावडे, दुर्वेश साळुंखे, अनिकेत पोटे (सर्व मुंबई उपनगर); प्रतीक वाईकर, अक्षय गणपुले, सुयश गरगटे, सागर लेंगरे (सर्व पुणे); सुरेश सावंत, सुरज लांडे (सर्व सांगली), महेश शिंदे (ठाणे) रामजी कश्यप (सोलापूर)
राखीव: निखिल कापुरे (सोलापूर), हर्षद हातणकर (मुंबई उपनगर), दीपक माने (सांगली).
प्रशिक्षक: बिपिन पाटील (पुणे)
व्यवस्थापक: श्रीकांत ढेपे (सोलापूर)
महिला संघ:
प्रियंका इंगळे, काजल भोर, कोमल दारवटकर व श्वेता वाघ (सर्व पुणे); रेश्मा राठोड, रूपाली बडे, तेजश्री कोंडाळकर (सर्व ठाणे), अपेक्षा सुतार – कर्णधार (रत्नागिरी), निकिता पवार, ऋतुजा खरे (सर्व उस्मानाबाद), ज्योती मुकाडे (औरंगाबाद), प्रतीक्षा खुरंगे (सातारा)
राखीव: प्राजक्ता पवार (सांगली), स्नेहल जाधव (पुणे), रितिका मगदूम (सांगली)
प्रशिक्षक: महेश पालांडे (ठाणे)
व्यवस्थापिका: रोहिणी ढेपे (सोलापूर)