
राज्य खो-खो पंच शिबिराप्रसंगी घोषणा
सोलापूर, २८ मे, क्रीडा प्रतिनिधी,
महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोहोळमध्ये राज्य खो स्पर्धा घेणार असल्याची घोषणा आमदार यशवंत माने यांनी केली.
महाराष्ट्र खो-खोअसोसिएशन, सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशन यांच्या संयक्त विद्यमाने व सोलापूर कास्ट्राईब शिक्षक संघटना यांच्यातर्फे शनिवारी ह.दे. प्रशालेच्या प्रांगणातील नूतन मराठी विद्यालयात शनिवारी सुरू झालेल्या राज्य खो-खो पंच शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या शिबिरात राज्यातून ३०० पंच सहभागी झाले आहेत. यावेळी उद्योजक सुधीर खरटमल, भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव, राज्य खो खो असोसिएशनचे सचिव गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, दूध संघाचे व्हाइस चेअररमन दीपक माळी, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे, कास्ट्राईब शिक्षक संघटना अध्यक्ष श्रीशैल कोरे आदी उपस्थित होते. श्रीरंग बनसोडे यांनी प्रास्ताविक केले. शिवशंकर राठोड यांनी सूत्रसंचालन केले. संतोष कदम यांनी आभार मानले.
———
खो खो अल्टिमेट लीग ऑगस्टमध्ये
पुढील तीन महिन्यात खो खोचा सिझन असून खो खो अल्टिमेट लीग ऑगस्टमध्ये व राज्य मिनी ऑलम्पिक स्पर्धा सप्टेंबरमध्ये पुण्यात होत आहे. तसेच डाबर ग्रूपच्या वतीने खो खोमध्ये ६०० कोटी रुपयाची गुंतवणूक होत आहे.
– डॉ. चंद्रजित जाधव, भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव
———
क्रीडा विकासासाठी मदत
मला व्यवसायातून जे उत्पन्न मिळते. त्यातील २५ टक्के रक्कम मी प्रत्येक क्षेत्राच्या विकासासाठी मदत रूपाने खर्च करतो. त्यात क्रीडा क्षेत्राला प्राधान्य देतो.
– सुधीर खरटमल, उद्योजक
——- फोटो ——
खो-खो पंच शिबिराचे उद्घाटन करताना आमदार यशवंत माने व मान्यवर.
खो-खो पंच शिबिराचे उद्घाटनप्रसंगी उपस्थित पंच.














