ठाणे, १५ मार्च. (क्री. प्र.), जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय, भारतीय खेल प्राधिकरण आणि खेलो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व दि अम्यॅच्यूअर खो-खो असोसिएशन ठाणे आयोजित खेलो इंडिया खो-खो दस का दम वुमन्स लीग २०२३ नुकतीचा धी युनायटेड स्पोर्ट्स क्लब ठाणे येथे आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत मुंबई ठाण्यातील अव्वल दहा संघांना प्रवेश देण्यात आला होता. या स्पर्धेत सर्वच स्पर्धेत संघांनी उत्कृष्ठ कामगिरीचे प्रदर्शन केले. परंतु नवी मुंबईच्या रा. फ. नाईक व बदलापूरच्या शिवभक्त क्रीडा मंडळाने उत्कृष्ठ कामगिरीच्या जोरावर अंतिम फेरीत धडक मारली.
स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नवी मुंबईच्या रा. फ. नाईक महिला संघाने बदलापूरच्या शिवभक्त क्रीडा मंडळावर १०-९ असा एक डाव एक गुणाने दणदणीत विजय मिळवत दास का दम मध्ये बाजी मारली. रा. फ. नाईकच्या रूपाली बडेने ३.१०, २.४० मि. संरक्षण करत विजयाची पायाभरणी केली, प्रणाली मागरने २.५०, २.२० मि. संरक्षण, शीतल भोरने दोन्ही डावात नाबाद रहात १.२०, ३ मि. संरक्षण करत २ खेळाडू बाद करत अष्टपैलू खेळ करत विजयात महत्वाचा वाटा ऊचलला, साक्षी तोरणेने ३ खेळाडू बाद केले तर पुजा फरगडे व श्रध्दा शिंदे यांनी प्रत्येकी २-२ खेळाडू बाद केले. तर पराभूत शिवभक्तच्या रेशमा राठोड १.३० मि. संरक्षण करत ३ खेळाडू बाद केले तर मनोरमा शर्मा व कांचन पवारने प्रत्येकी २-२ खेळाडू बाद करण्यात यश मिळवले. मात्र शिवभक्तच्या इतर खेळाडूंनी निराशजनक कामगिरी केल्याने त्यांना मोठ्या परभवाला सामोरे जावे लागले.
या स्पर्धेत रूपाली बडे – सर्वोत्कृष्ट संरक्षक (रा. फ. नाईक), रेश्मा राठोड – सर्वोत्कृष्ट आक्रमक (शिवभक्त) व शीतल भोर – सर्वोत्कृष्ट अष्टपैलू (रा. फ. नाईक ) खेळाडू ठरले.
स्पर्धेचा उद्घाटन व बक्षीस समारंभ प्रसंगी गोविंद शर्मा : सचिव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन, अरुण देशमुख : खजिनदार, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन, गंधाली पालंडे : सहसचिव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन, सुबोध ठाणेकर : सहाय्यक आयुक्त कळवा प्रभाग समिती, दत्तात्रय गोपाळ कोळी : अध्यक्ष, धी युनायटेड स्पोर्ट्स क्लब, हेमंत जयवंत कोळी : आयोजक, धी युनायटेड स्पोर्ट्स क्लब, वैशाली लोंढे-पाठक (उद्घाटक) छत्रपती पुरस्कार प्राप्त, उपाध्यक्ष महाराष्ट्र खो-खो असोसिएशन, प्रशांत पाटणकर : छत्रपती पुरस्कार प्राप्त, माधुरी कोळी : तांत्रिक समिती सदस्य, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन, बाळ तोरस्कर – प्रसिद्धी समिती प्रमुख महाराष्ट्र खो खो असोसिएशन, रोहिणी डोंबे (कोळी) : राष्ट्रीय प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक आणि क्रीडा प्रभारी जोशी बेडेकर महाविद्यालय, रजनी ठाणेकर : राष्ट्रीय खेळाडू, शितल भोर : आंतरराष्ट्रीय खेळाडू, पौर्णिमा सकपाळ : आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रियंका भोपी : आंतरराष्ट्रीय खेळाडू, मंदार कोळी – सचिव दि अम्यॅच्यूअर खो खो असोसिएशन ठाणे ज़िल्हा, महेश पालांडे – खजिनदार – दि अम्यॅच्यूअर खो खो असोसिएशन ठाणे, सुधीर थळे – उपाध्यक्ष – दि अम्यॅच्यूअर खो खो असोसिएशन ठाणे हे उपस्थित होते.