मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर ) : समता शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व अष्टपैलू व्यक्तिमत्व राजेश सुभेदार यांची मुंबई उपनगर खो खो संघटनेच्या अध्यक्ष पदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. सह्याद्री विद्यामंदिर भांडुप येथे घेण्यात आलेल्या निवडणुकीत घवघवीत यश संपादन करून त्यांची दुसऱ्यांदा ही निवड करण्यात आली आहे. राजेश सुभेदार यांनी पहिले अध्यक्ष पद तीन वर्ष भूषवले असून दुसऱ्यांदा निवड होत असल्या बद्दल मला आनंदच आहे. पुन्हा खो खो च्या प्रसार आणि प्रचार कामात आणखीन भरीव कामगिरी करता येईल उपनगरात सर्व तालुके एकत्र आणण्याचा मानस आहे . उत्तम खेळाडूसाठी शिष्यवृत्ती देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सुभेदार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले. समता विद्या मंदिर, सावित्रीबाई फुले मुलींची शाळा व जुनिअर कॉलेज आणि टूलिप इंग्लिश स्कूल मधील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.