मुंबई, ३ जुलै, (क्री. प्र.), मुंबई खो खो संघटनेच्या पंचमंडळाने मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ (BPED) महाविद्यालय, वडाळा यांच्या सहकार्याने त्यांच्याच महाविद्यालयात जिल्हा पंचवर्ग व पंच परीक्षा आयोजित केली आहे.
मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ (BPED) महाविद्यालय, वडाळा येथे दि. ४ ते ७ जुलै २०२२ या कालावधी रोज सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत पंचवर्ग घेऊन त्यांची सोमवार दि. ११ जुलै २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता परीक्षा घेण्यात येणार असल्याचे संघटनेतर्फे जाहीर केले आहे.
या पंच परीक्षेत पास झालेल्या पंचांना भविष्यात राज्य पंच परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी मुंबई खो खो संघटनेचे सचिव सुरेंद्र विश्वकर्मा (९८७०२६१६१९) यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.