चिपळूण : खेर्डीचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष काशिनाथ दाते यांचा सोमवारी (ता. 11) रोजी सुकाई परिवर्तन पॅनलतर्फे सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयेंद्रथ खताते आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते हा सत्कार झाला.
ग्रामपंचायतीच्या सभागृहात सोमवारी सायंकाळी 4.30 वाजता सत्कार आणि तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांचा पदग्रहण सोहळा झाला. या वेळी सुरुवातीला कोरोनामुळे निधन झालेल्या ग्रामस्थांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर श्री. खताते आणि श्री. यादव यांच्या हस्ते श्री. दाते यांचा सत्कार करण्यात आला. तसेच खेर्डी दातेवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीनेही या वेळी श्री. दाते यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी खेर्डीच्या सरपंच वृंदा दाते, उपसरपंच, विजय शिर्के, पंचायत समितीच्या माजी सभापती स्नेहा मेस्त्री, खेर्डीच्या माजी सरपंच जयश्री खताते, माजी सरपंच अजित खताते, माजी सरपंच सुनील मेस्त्री, माजी सरपंच रवींद्र फाळके, शिवसेनेचे विभागप्रमुख शशिकांत कासार, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष यासीन चौगुले, खेर्डी ग्रामपंचायतीचे सदस्य विनोद भुरण, अभिजित खताते, सचिन मोहिते, अपर्णा दाते, सुप्रिया उतेकर, अश्विनी पंडित, तंटामुक्ती समितीचे सदस्य अनिल फाळके आदी उपस्थित होते.
यावेळी जयेंद्रथ खताते आणि प्रशांत यादव यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी काशिनाथ दाते यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या माध्यमातून तंटामुक्त गाव म्हणून खेर्डीचा नावलौकीक होईल, असा विश्वास व्यक्त केला. जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सौ. भुरण मॅडम यांनी सूत्रसंचालन केले व सर्वांचे आभार मानले.