रत्नागिरी : “खेकडा संवर्धन प्रशिक्षण ” आठ आणि 9 तारखेला रत्नागिरी येथे होणार आहे. हे प्रशिक्षण हे विनाशुल्क आहे. प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळण्याकरिता इच्छुकांनी सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय रत्नागिरी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाने केले आहे.
इच्छूकानी सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी कार्यालयात अर्ज नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक ०२३५२-२३३७२६ व भ्रमणध्वनी क्रमांक ९४२२३७४०९५.