रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): खेड नगर परिषदेच्यवतीने आज जनतेमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी यासाठी शहरातून स्वच्छता रॅली काढण्यात आली. नगर परिषदे जवळच्या मैदानातून हि रॅली सुरु झाली. यावेळी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह नगरसेवक, हजारो विद्यार्थी, नागरिक, नगर परिषद कर्मचारी सहभागी झाले होते.
संपूर्ण राज्यात सध्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात स्वच्छतेचा जागर सुरु झाला आहे. जिल्ह्यातील नगर परिषदा देखील या अभियानामध्ये सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे सर्वच नगर परिषदाकडून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येत आहे. खेड नगर परिषदेकडूनही आज याबाबत स्वच्छता रॅली काढण्यात आली. शालेय विद्यार्थी, सेवाभावी संस्था, बचत गट, नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते. स्वच्छतेबाबत जनजागृतीच्या या रॅलीदरम्यान घोषणा देण्यात आल्या. स्वच्छ खेड, सुंदर खेड ठेवण्यासाठी या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे.