रत्नागिरी : नागरिकांच्या सतर्कतेमुळे जाळ्यात अडकलेल्या खवले मांजराला जीवनदान देण्यात वन्यप्रेमी तसेच व वनविभागाला यश आलं आहे. चिपळूण तालुक्यातील मालदोली गावात शैलेश संसारे यांनी कुक्कुटपालनासाठी घराजवळ जाळं लावलं होतं. या जाळ्यात खवले मांजर अडकलं. त्याला या जाळ्यातून काही केल्या बाहेर पडता येईना. याची माहिती सह्याद्री संस्थेचे भाऊ काटदरे आणि वनरक्षक आर. डी. खोत यांना देण्यात आली. या दोघांनी तातडीने याठिकाणी जाऊन या खवले मांजराला कोणतीही दुखापत न होता सुखरुप जाळ्यातून बाहेर बाहेर काढलं. खवले मांजर हा दुर्मिळ वन्य जीव असून त्यांच्या संरक्षणासाठी उपाय राबविले जात आहेत.