खासदारांच्या प्रचाराने विराधकांचे धाबे दणाणले
विकासकामांना समोर ठेऊन खासदारांचा प्रचार
मुंबई, दि. १६ (प्रतिनिधी) – भांडुप विधानसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कोरगावकर यांच्या प्रचारार्थ भांडुप येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतिने एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. रमेश कोरगावकर यांच्या विरोधात मनसेचे शिरिष सावंत तर शिवसेना शिंदेगटाचे अशोक पाटील निवडणुक रिंगणात आहेत.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपायला आता केवळ दोनच दिवस राहिले असून सर्वच उमेदवार सभा, बैठकांवर जोर देत आहेत. उद्याचा रविवार उमेदवारांसाठी महत्त्वाचा असून बाईक रॅली मार्फत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत जाण्याचा प्रयत्न उमेदवार करणार आहेत. भांडुप मध्येही महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कोरगावकर यांच्या बैठका व सभा सुरु असून खासदार संजय दिना पाटील यांनी भांडुप मध्ये प्रचारावर जोर दिल्याने रमेश कोरगावकर यांचा विजय निश्चित मानला जातोय. कार्यकर्त्यांन मध्ये नवचैतन्य आले असून त्याचा परिणाम भांडुप मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतिने एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते. गेल्या सात महिन्यांत रमेश कोरगावकर यांच्या मदतीने पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असून वाहतुक समस्या, संरक्षक भिंत याबाबत पालिका अधिका-यांशी चर्चा झाली असून लवकरच याप्रश्नावर कायम स्वरुपी तोडगा काढणार असल्याचे खा. संजय दिना पाटील यांनी सांगितले. अनेक ठिकाणी रस्तारुंदीकरण करण्यात येत असून एसआरऐचे रखडलेले कामे सुरु करण्यात येत असल्याचे खा. संजय दिना पाटील यांनी सांगितले.