पनवेल : पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी खारघर भाजपच्या काही इच्छुक उमेदवारांनी खारघर विकास आघाडी तयार करून अपक्षअर्ज भरले होते. मात्र लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासोबत पदाधिकाऱ्यांशी चर्चाकेल्यानंतर आघाडीतील उमेदवार राजेंद्र उर्फ मामा मांजरेकर,अजय माळी,संतोषशर्मा,सुनील बुचडे आणि विजय पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपालासाथ देण्याचा निर्धार केला आहे.
पनवेल महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडेसर्वाधिक इच्छुक उमेदवार होते. ज्यांना तिकीट मिळाले नाही असे प्रमुख पदाधिकारीनाराज होतील मात्र पक्ष सोडून जाणार नाहीत त्याचबरोबर कार्यकर्त्यांशी चर्चा करूननाराजी दूर करू असा विश्वास लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार अभिमन्यू पाटील यांच्यासारखे खंदे समर्थक माघारी परतले आहेत.