रत्नागिरी : आषाढी एकादशीचा उत्साह राज्यात पहायला मिळत आहे. पंढरपुरात भक्तांचा मेळा जमला असताना रत्नागिरीतल्या खंडाळा येथील इंग्लिश मिडियम स्कुलच्या मुलांनी अनोखी दिंंडी काढली. मुलांनी ग्रंथदिंडी झाडे लावा झाडे जगवा, शिकून मोठे व्हा असा संदेश दिला. वारकऱ्यांच्या वेषभूषेत आलेल्या या मुलांनी टाळ आणि मृदुंगाच्या गजरात फेर धरला. विठ्ठलाचे गुणगान गात या मुलांनी दिंडी काढली. खंडाळा गावातील चौकात या मुलांनी फेर धरत गोल रिंगण केलं. या रिंगणात विठूरायाचं चित्र रेखाटण्यात आलं. जवळपास अडिचशेहून अधिक मुलांनी या दिडीत सहभाग नोंदवला. तसेच शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष बाळ जोग यांच्यासह पदाधिकारी व शिक्षण उपस्थित होते.