मुंबई : भारतीय जनता पार्टी विक्रोळी पूर्व मंडळ अध्यक्षपदी केतकी अरविंद सांगळे यांची निवड करण्यात आली. केतकी यांच्या निवडीमुळे त्यांचे सामाजिक आणि राजकीय स्तरावर अभिनंदन केले जात आहे. आमदार मिहिर कोटेचा यांच्या हस्ते केतकी यांच्या सत्कार करण्यात आला.
केतकी सांगळे या विक्रोळीतील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यात नेहमीच सहभागी होत असतात. विविध सामाजिक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत. विक्रोळी विभागातील नागरिक नागरी समस्यांसाठी नेहमीच केतकी यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेत असतात. एखादी समस्या प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन ती सोडवण्यास केतकी या प्राध्यान्य देत असतात. विक्रोळी विभागात भाजप वाढविण्यास त्यांनी केलेले प्रयत्न आणि सामाजिक कार्य पाहून पक्षाने त्यांची महत्वाच्या पदावर नियुक्ती केली.
“पक्षानं माझी नियुक्ती केल्याने मी आभार मानतो. माझे सामाजिक कार्य नेहमीच सुरू राहील. लोकांचे प्रश्न सुटावेत, याकडे मी नेहमीच प्राधान्य देईन”, अशी प्रतिक्रिया केतकी सांगळे यांनी दिली.
केतकी सांगळे या विक्रोळीतील सामाजिक प्रश्न सुटावेत म्हणून नेहमीच आघाडीवर असतात, त्यांची नियुक्ती झाल्याने त्यांचे जनता दल सेक्युलर विक्रोळी तालुक्याच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो, असे जनता दल विक्रोळी तालुकाध्यक्ष यतीन तोंडवळकर, कन्नमवार नगर प्रभाग अध्यक्ष भूषण भिसे, जद सहकार सेल उपाध्यक्ष नितीन अडकर यांनी सांगितले.