![](http://www.konkanvruttaseva.com/wp-content/uploads/2020/06/mask-300x225.jpg)
मुंबई, 1 जून, (निसार अली) : राष्ट्र सेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष जाॅर्ज जेकब, केरळ सेवा दलाचे राज्य प्रमुख विजयराघवन यांनी मुंबईतल्या मित्रांसाठी अनोखी भेट पाठवली. कोविड योद्धे, कार्यकर्ते यांच्यासाठी उच्च प्रतीचे मास्क पाठवलेत. मुंबईत काम करताना केरळातील मित्रांनी इथल्या कार्यकर्त्यांच्या पाठिशी उभं रहाणं हे अनोखे बंध आहे. ही काॅम्रेडशीप उभारी देणारी आहे.असे मत मुंबई च्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. गोरेगाव ला पत्रकार युवराज मोहिते यांच्या घरच्या पत्त्यावर अंदाजे 5 हजार मास्क पाठविण्यात आले.