उजैन (मध्य प्रदेश) : डाव्यांविरोधात रा.स्व संघपरिवार दिवसेंदिवस आक्रमक रुप धारण करत आहे. आता तर केरळमधील माकपचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांचे मुंडके छाटण्याची भाषा संघाकडून केली जात आहे. विजयन यांचे मुंडके छाटून आणणाऱ्यास एक कोटींचे बक्षिस देऊ, अशी गरळ उज्जैनमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) महानगर प्रचारप्रमुख डॉक्टर कुंदन चंद्रावत यांनी ओकली आहे. तसेच बक्षिसाची रक्कम पूर्ण करण्यासाठी राहते घरही विकेन, अशी दर्पोक्ती चंद्रावत यांनी मारली आहे. चंद्रावत यांच्या विधानाने देशभरात एकच खळबळ उडाली आहे.
केरळमध्ये संघ स्वयंसेवकांच्या हत्या केल्या जात आहेत आणि तेथील सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. यामुळे संघ परिवारात संतापाची भावना निर्माण झाली आहे. माकपचे कार्यकर्ते या हत्यांमध्ये सहभागी आहेत, असा आरोप संघ परिवाराकडून होत आहे, या पार्श्वभूमीवर चंद्रावत यानी हे विधान रागाच्या भरात केली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
संघ परिवारातील कार्यकर्त्यांवर हल्ले होत असल्याच्या निषेधार्थ उज्जैनमधील शहीद पार्क येथे बुधवारी सभा घेण्यात आली, त्यात चंद्रावत यांनी हे वादग्रस्त विधान केले. भगतसिंग यांनी इंग्रजाविरोधात बॉम्बचा वापर केला. मी देखील त्याचप्रमाणे चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. हिंदू झोपा काढत नाही आहेत, असेही ते म्हणाले.
>>>>>>
“मी अश्या वक्तव्याचा निषेध करतो. रा. स्व. संघाकडून उघडपणे केरळच्या मुख्यमंत्र्यांना धमकी दिली जात आहे आणि सरकारकडून त्यांना संरक्षण मिळत आहे. – सीताराम येचुरी, सरचिटणीस, माकप