
मुंबई, (निसार अली) : केरळ येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मालवणीसह मुंबई भरातील मशिदींत येणार्या भाविकांकडून मदतनिधी गोळा करण्यात आला. शुक्रवार दिनांक 17 रोजी नमाज पठणानंतर स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशनच्या पुढाकाराने अनेक मशिदीतून निधी गोळा केला गेला. ही रक्कम केरळच्या पूरग्रस्तांसाठी पाठवली जाणार आहे. यावेळी अडीच लाख रुपयांचा निधी जमा झाला. आर्थिक मदतीसह केरळला जीवनोपयोगी साहित्यही पाठवण्यात येणार आहे.
दरम्यान, कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन व जमाते इस्लामीच्या वतीने मदतीनिधी गोळा करून मदत केली जाते, असे यावेळी सांगण्यात आल.















