रत्नागिरी, प्रतिनिधी : केंद्र सरकारडून महाराष्ट्राला कोरोना लसीकरणाचा पुरवठा होत नसल्याचा आरोप करत रत्नागिरीतल्या जिल्हा काॅग्रेसनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. जिल्हा काँग्रेस भवन कार्यालयाच्या बाहेर ‘घंटा नाद थाळी नाद’ आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सुचनेनुसार जिल्हाध्यक्ष ऍड विजयराव भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.
केंद्रसरकार महाराष्ट्राला कोरोना लसीकरणाच्या बाबतीत दुजाभाव करत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा धिक्कार रत्नागिरीतल्या काॅग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सुचनेनुसार जिल्हाध्यक्ष ऍड. विजयराव भोसले यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने कोरोना काळात महाराष्ट्र सरकारला लस पुरवठ्याच्या बाबतीत जो अन्याय केला आहे, त्या बाबतीत बुधवारी येथील काँग्रेस भवन कार्यालयाबाहेर सकाळी 11 वाजता ‘घंटा नाद थाळी नाद’ करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड विजयराव भोसले, अन्वर काद्री, दिपक राऊत, हारीस शेकासन, बंडू सावंत, सुनील विश्वासराव, कपिल नागवेकर, सुस्मीता सुर्वे, रिझवाना शेख, आदी उपस्थित होते .