मुंबई: कामगार नेते सुखदेव काशीद यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेतील इंजिनिअर्स असोसिएशन या कामगारांच्या संघटनेच्या मुंबईच्या अध्यक्षपदी निवड नुकतीच करण्यात आली. गोपाळ शेट्टीगार सभागृह येथे झालेल्या म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत, कामगार नेते दिवंगत शरद राव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या असोसिएशनच्या अध्यक्षपदावर काशिद यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी अभियंते नवनाथ घाटगे, सरचिटणीसपदी अँड्. महाबळ शेट्टी, उपाध्यक्षपदी अभियंते रमेश मालवीय, विजय पाचपांडे, राजेन्द्र जोशी, अभियंते जीवनराव पाटील, अभियंते रमेश भुतेकर, अभियंते संजय खराडे आणि कोषाध्यक्षपदी शरद आप्पाजी राघव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. चिटणीसपदावर अभियंते जगन्नाथ गव्हाणे, दीपक चौगुले, अभियंते यशपाल हंगरगेकर, अभियंते रमेश कु-हाडे, आणि अभियंते विशाल कोकाटे यांचीही निवड झाली. सदर वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध विषयांवरी १२ ठराव सर्वानुमते मंजूर झाले आहेत. मुंबई महापालिकेत कार्यरत असलेल्या अभियंत्यांच्या मागण्या, अडचणी आणि समस्यांबाबत लवकरच निर्णायक आंदोलन हाती घेतले जाईल त्यामध्ये सक्रीय सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे सरचिटणोस अँड् महाबळ शेट्टी यांनी या वेळी केले. असोसिएशनचे कार्याध्यक्ष घाडगे यांनी अभियंत्यांच्या मागण्या आणि प्रश्नांबाबत सविस्तर माहिती देऊन नजीकच्या काळात होणा-या आंदोलनात एकजुटने सहभाग होऊन आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात काशिद यांनी सांगितले की, महानगरपालिकेमध्ये सद्या अभियंत्यावर अन्यायाचे षडयंत्र सुरु आहे. रस्ते खात्यातील १८० अभियंत्यांना चुकीच्या पद्धतीने चौकशी करुन संबंध नसतानाही खोटे आरोप करुन, अभियंत्यांना जबाबदार पकडून शिक्षा करण्यात आलेली आहे, त्या सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील तसेच मागील वेतन करातील त्रुटी दुर करुन नवीन वेतन करारात अभियंत्यांना न्याय मिळवून देण्याचा असोसिएशनचा प्रयत्न असेल. अँड सुखदेव काशीद तसेच नवनियुक्त कार्यकारणीचे सर्व सभासदांनी अभिनंदन केले.