रत्नागिरी (आरकेजी) : मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाचे घाटाच्या बोगद्याचे काम २०२० पर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी रत्नागिरीत दिली आहे.
कोकणात येणाऱ्या व मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना घाटाच्या रस्त्यामुळे जास्त अंतर तर कापावे लागतेच तसेच वेळही जास्त लागतो. प्रवासांच्या सोईसाठी भोगांव पासून ते कशेडी गावांपर्यंत बोगदा निर्माण करुन प्रवासांचा वेळ व अंतर वाचणार आहे, असे गृह निर्माण, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी सांगितले. ५०० कोटीचे या प्रकल्पामध्ये साडेनऊ कि. मी. अंतराचे निर्माण कार्य येत्या मे महिण्यापासून चालू होणार आहे. व २०२० पर्यंत कशेडी घाटाचे काम पुर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री रविंद्र वाईकर यांनी दिली. या वेळी जिल्हाधिकारी प्रदीप पी., प्रांतअधिकारी अमित शेडगे, खेडचे प्रांतअधिकारी सोनवणे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कशेडी घाट चढण्यासाठी तसेच उतरण्यासाठी सुमारे ३४ किलो मीटरचे अंतर वाहनांना पार करावे लागते. हे अंतर पार करण्यासाठी वाहनांना सुमारे ३० ते ४० मिनिटांचा कालावधी लागतो. परंतु कशेडी घाटात बोगदा तयार केल्यास हे अंतर अंदाजे ५ मिनिटांमध्ये पार करणे वाहनचालकांना सहज शक्य आहे. तसेच या घाटावरील वाहनांचा प्रवास अपघात विरहित होऊ शकतो. या बोगद्याचे काम पुर्ण झाल्यावर त्या रस्त्याची डागडुजीचे काम ४ वर्षे कंत्राटदारालाच करावे लागणार आहे. तसेच या बोगद्यामध्ये जाण्यासाठी ३ व येण्यासाठी ३ अशा सहा लेन तयार करण्यात येणार असून सुमारे पावणे दोन किलोमीटरचे दोन बोगदे तयार करण्यात येणार आहेत.