डोंबिवली, (प्रशांत जोशी) : ओमकार कर्णबधीर विकास संस्था, डोंबिवली आणि युवक कॉंग्रेस डोंबिवली विधानसभा सचिव तथा शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती अमित म्हात्रे यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीत प्रथमच राज्यस्तरीय कर्णबधीर मुलांची रिंग फुटबॉल स्पर्धा आयोजित केली होती. मुंबई अंधेरी येथील अंधेरी-बी ने टाय-२० गुण घेऊन अंतिम सामन्यातील विजयावर शिक्कामोर्बत केले. विशेष म्हणजे त्याच टीमच्या शुभम डवरीला बेस्ट किपर म्हणून बेस्ट गोल्डन बूट आणि प्लेअर ऑफ टूरनामेंटने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
रिंग फुटबॉल स्पर्धा शनिवारी डोंबिवली जिमखाना येथील म्हैसकर स्पोर्ट्स ग्राउंड येथे पार पडली. या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी झाले होते. अंधेरी – बी आणि कोल्हापूर यांचा अंतिम फेरीत अतितटीचा सामना झाला. यात दोन्ही संघानी उत्तम खेळाचे प्रदर्शन केले. कर्णबधीर मुले इतर सामान्य मुलांसारखे खेळत असल्याचे पाहून प्रेक्षकांनी आश्चर्य व्यक्त करीत आनद उत्सव साजरा केला.
मुंबई, ठाणे, कोल्हापूर, औरंगाबाद, पुणे आदी शहरातील कर्णबधीर खेळाडूंचा मोठा सहभाग होता. स्पर्धेची सुरुवात माजी नगरसेवक जितेंद्र भोईर आणि परिवहन समितीचे सदस्य शैलेन्द्र भोईर, भाजप पदाधिकारी उमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पंच म्हणून कोलकत्ता येथील मोहन बागान संघाचे माजी खेळाडू कुलदीप पाजी यांनी काम पहिले.
अंतिम सामन्यात अंधेरी- ब व कोल्हापूर संघ यांच्यात बरोबरी जाळ्याने सामन्यानंतर दोन्ही संघाला पेनल्टी किक देण्यात आला. कोल्हापूर संघातील गोलरक्षक टेरेनने अतितटीच्या सामन्यात पेनल्टी किक मध्ये शेवटची किक अडवून स्पर्धा जिंकली.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभावेळी बेस्ट किपरचे पदक कोल्हापूर संघातील खेळाडू शुभम डवरी याला सामजिक कार्यकर्ते श्रीधर सुर्वे आणि जितेंद्र आमोणकर यांच्या हस्ते देण्यात आले. बेस्ट गोल्डन बूट आणि प्लेअर ऑफ टूरनामेंटचा मानकरीहि अंधेरी-बी संघातील टेरस या खेळाडूला शिल्पा म्हात्रे आणि भाजप पदाधिकारी राधिका मोरे,सचिन म्हात्रे, निखील भोईर,मंगेश पवार यांच्या हस्ते देण्यात आले. या उपविजेता संघ कोल्हापूर संघास शिंदे, संस्थेच्या संचालिका आशा कुलकर्णी, आनंद गोलार यांच्या हस्ते चषक, आठ हजार रुपये रोख रक्कम देण्यात आले. विजेत्या अंधेरी-बी संघास समाजसेवक भास्कर म्हात्रे, कॉंग्रेस पदाधिकारी एकनाथ म्हात्रे, आणि युवक कॉंग्रेस डोंबिवली विधानसभा तथा शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती अमित म्हात्रे भाजप पदाधिकारी उमेश पाटील, माजी नगरसेवक दिलीप भोईर यांच्या हस्ते १२ हजार रुपये रोख रक्कम आणि ट्रॉफी देण्यात आली. यावेळी अमित म्हात्रे यांनी सांगितले कि, ही स्पर्धा कर्णबधीर मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्याचा उद्देश घेतली. या मुलांचा आनंद पाहून अशाच पद्धतीचे कार्य पुढेही करण्याचा विचार आहे असे सांगितले.