रत्नागिरी, (आरकेजी) : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी अंतर्गत जिल्ह्यातील 16 हजार 592 शेतकऱ्यांना 46 कोटी 17 लाख 31 हजार 670 रुपयांचा कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. यात 9 हजार 979 शेतकरी हे कर्जमाफी अंतर्गत तर 6 हजार 613 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा उपनिंबधक श्रीमती बकुळा माळी यांनी दिली.
जिल्हा उपनिबंधक माळी यांनी सांगितले की २०१२-२०१३ ते २०१५-२०१६ या सलग चार वर्षात राज्यात अपुरा पाऊस झाल्यामुळे खरीब/रब्बी हंगामात बहुसंख्य गावातील आणेवारी ५० पैशापेक्षा कमी होती. जिल्हयातील काही भागात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले होते. त्यामुळे बरेच शेतकरी पिक कर्जाची परतफेड करु शकले नाही. परिणामी हे शेतकरी थकबाकीदार राहील्यामुळे असे शेतकरी बँकेकडून नव्याने पिक कर्ज घेण्यास पात्र होऊ शकले नाही. या पार्श्वभूमीवर राज्य शासानाने अशा थकीत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे जाहिर केले होते.
राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान जाहिर केली आहे. या योजनेंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जुन २०१६ अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यत कर्ज माफी व दिड लाख वरील शेतकऱ्यांना १ वेळ समजोता योजना लागू केली. तसेच २०१५-१६ व ०१६-२०१७ वर्षात ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची नियमितपणे परतफेड अशा शेतकऱ्यांना २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांचे प्रोत्साहन पर लाभ देण्याचे घोषित केले होते. २००९-२०१० ते २०१५-२०१६ या कालावधीत कर्जांची पुर्नगठण केलेल्या शेतकऱ्यांपैकी जे शेतकरी ३० जुन २०१६ पर्यंत थकबाकीदार असतील.
शासन निर्णयानुसार जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकाच्या रत्नागिरी जिल्हयातील थकबाकीदार शेतकऱ्यांना राज्य शासनाने पुरविलेल्या कॉलम १ ते ६६ नमुन्याप्रमाणे ऑनलाईन माहिती भरुन दिली होती. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रत्नागिरी जिल्हयातील 11 हजार 815 शेतकऱ्यांना २३ कोटी ६८ लाख ९५ हजार ६७० रुपयांची कर्जमाफी आजपर्यंत मिळाली आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीयकृत बँकेमार्फत 4 हजार 777 कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना २२ कोटी ४८ लाख ३६ हजार रुपयांची कर्जमाफी आजपर्यंत मिळाली आहे, असे एकूण सध्यास्थितीत रत्नागिरी जिल्हयात १६ हजार ५९२ एवढया लाभार्थी शेतकऱ्यांना कर्ज माफी अंतर्गत ४६ कोटी १७ लाख ३१ हजार ६७० एवढी रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यात साधारण41 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 19 हजार कोटी रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आले आहे . या योजनेंतर्गत 77 लाख अर्ज प्राप्त. छाननीअंतर्गत डुप्लिकेशन झालेले खाते दूर करुन69 लाख खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरु. त्यापैकी जवळपास41 लाख खात्यांमध्ये कर्जमाफीचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून बँकांकडे सुमारे19 हजार कोटी रुपये इतका निधी हस्तांतरित करण्यात आली आहे. शेवटच्या पात्र शेतकऱ्याला मदत मिळेपर्यंत ही योजना सुरु ठेवली जाईल असेही यावेळी जिल्हा उपनिंबधक बकुळा माळी यांनी सांगितले.