रत्नागिरी : जिल्ह्यातील शेतकऱ्यानी कर्ज माफीसाठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन महाराष्ट्र शासनाचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 या योजनेअंतर्गत यापूर्वीच्या विहीत कालावधीत अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची सुविधा पुन्हा उपलब्ध करुन योजनेचे लाभ देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यानुसार सदरचे वंचित शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याचा कालावधी ०१ मार्च २०१८ ते ३१ मार्च २०१८ असा असणार आहे. मात्र यापूर्वी या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाहीत. तरी सदर कालावधीत जिल्हातील वंचित शेतकऱ्यांनी नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जावून किंवा स्वत: माहिती भरुन ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात सहकार विभागाकडून करण्यात आलं आहे. सदरचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सेवा नि: शुल्क आहे.