मुंबई दि. ८ : कराड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्ग १९ ई च्या प्रलंबित कामाबाबत व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे (VC) वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आढावा घेतला.
राज्यमंत्री श्री. देसाई म्हणाले, संगमनगर ते घाटमाथा या एकूण 13.1 कि.मी. व रक्कम रू. 16.85 कोटीच्या मजबुतीकरणाच्या कामास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. या कामाची निविदा प्रकिया प्रगतीत आहे. या कामाच्या तांत्रिक बाबी पूर्ण झालेल्या असून प्रशासकीय मान्यता अंतिम टप्यात आहे. रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात 15 एप्रिल 2021 पर्यत सुरू करण्याचे नियोजन आहे. या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करून लोकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता संबंधित यंत्रणा व कंत्राटदार यांनी घ्यावी, असे निर्देश श्री. देसाई यांनी दिले.
तसेच कराड ते पाटण या मार्गावरील एल अॅण्ड टी कंपनीने अपूर्ण अवस्थेत सोडलेले काम 31 मे 2021 पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देशही कंपनीला देण्यात आले .या कामकाजासाठी तेलेवाडी, नाडे, अडुळ या गावातील अपूर्ण असलेले कामकाज तात्काळ पूर्ण करावे . संबंधितांनी वेळेत काम पूर्ण न केल्यास त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या.
यावेळी बैठकीस व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे अधिक्षक अभियंता प्रदीप आवटी, कार्यकारी अभियंता श्री. देशपांडे,एल अॅण्ड टी कंपनीचे प्रतिनिधी श्री. प्रदीप तावरे, उप विभागीय अधिकारी, पाटण उत्तम दिघे, पाटणचे तहसिलदार, ,श्री. टोमपे उपस्थित होते.