रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी) : कंटेनर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना गुरुवारी घडली. रत्नागिरी – कोल्हापूर महामार्गावरील दाभोळे घाटात हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या भरधाव वेगातील कंटेनरने दाभोळे घाटातील तीव्र उतारात चाफवलीच्या दिशेने निघालेल्या दुचाकीला धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की दुचाकीस्वार काहि फुट अंतरावर उडून रस्त्यावर आपटले. अपघातानंतर गाडीवरील ताबा सुटल्याने कंटेनर काही अंतर पुढे जावून झाडावर आदळून पलटी झाला. कंटेनरच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला. यात चालक अडकून पडल्याने तो जागीच ठार झाला. तर दुचाकीस्वार चंद्रकांत बाळू रावण (३०/ चाफवली) व सुरेश सिताराम रावण (२९/ चाफवली) दोघे ठार झाले. दरम्यान, अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.