मुंबई : आज उत्कर्ष विद्यामंदिर, विक्रोळी, कन्नमवार नगर येथे पत्रकार अक्षय गायकवाड यांच्या पुढाकाराने हौसिंग सोसायट्यांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या विषयातील तज्ञ श्री. संतोष पालव यांनी मार्गदर्शन केले आणि उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते व बेस्ट वर्कर्स युनियनचे वरिष्ठ चिटणीस अरुण रावले यांच्या हस्ते श्री. पालव यांचा सत्कार करण्यात आला. दिशा सामाजिक ग्रुपचे दिनेश बैरीशेट्टी आणि भीमज्योत संघटनेचे अध्यक्ष भूपेंद्र हिरे यावेळी उपस्थित होते.
उत्कर्ष विद्यामंदिर येथे वर्ग उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री. राहुल वाघधरे यांचे विशेष आभार अक्षय गायकवाड यांनी मानले.