मुंबई : विक्रोळी येथील कन्नमवार नगरात रस्त्यांवर मोठं मोठे खड्डे पडल्याने नागरिकांचे, वाहतूकदारांचे हाल होत आहेत”. हे खड्डे त्वरित बुजवा. अन्यथा आंदोलन करू, असा संतप्त इशारा मनसे शाखाध्यक्ष जयंत दांडेकर यांनी दिला आहे.
सुमारे पाच ते आठ फूट इतके मोठे खड्डे रस्त्यांवर पडले आहेत, अशी माहिती दांडेकर यांनी दिली. यामुळं वाहन चालवताना, तसेच रस्त्यावरून चालताना अडथळे निर्माण होत आहेत. का म्हणून नागरिकांनी हा त्रास सहन करायचा? असा प्रश्न दांडेकर यांनी स्थानिक पालिका प्रशासनाला विचारला आहे.
पावसात खड्डे का पडतात? दरवर्षी आम्ही आंदोलन करायचे का? कित्येक वर्षे तेच करत आहोत. तरीही पालिकेत सुधारणा होत नाही, अशी खंत दांडेकर यांनी व्यक्त केली.
एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला कि उद्रेक होतो, त्याच प्रमाणे प्रशासनाने या रस्त्यावरील खड्डे यांचा अतिरेक करु नये, नाहीतर त्या खड्डयात अधिकाऱ्यांना बसवावे असे दांडेकर म्हणाले.