
पाणीपुरवठा होत नसल्याने पाणी घेण्यासाठी रहिवाशांच्या रांगा लागल्या होत्या
मुंबई, (निसार अली) : जलवाहिनीत सहा इंच दगड अडकल्याने तब्बल दहा दिवस कांदिवली पुर्वेतील सरस्वती चाळ, नरसी पाडा येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. पाणी पुरवठा होत नसल्याने स्थानिकांनी पालिकेला याबाबतची माहिती दिली. माजी आमदार रमेश सिंह ठाकूर यांनी ही पाठपुरावा केला. अखेर दोन दिवस पालिका कर्मचार्यांनी पाणी न येणाच्या कारणाचा शोध घेतला. त्यासाठी मोठा खड्डाही खणण्यात आला. तेव्हा जलवाहिनीत सहा इंची दगड़ असल्याचे आढळले. या दगडामुळेच पाणी रोखले जात होते. यानंतर तो काढून टाकण्यात आला, आणि पाणीप्रश्न सुटला.
स्थानिक महिला मंडळाच्या करुणा रास्कर आणि समाजसेवक राज लुइस यांनी पाणीप्रश्न सुटावा, यासाठी सातत्याने पालिका अधिकार्यांशी संपर्क केला. पणी येत नसल्याने नागरिकांचे हाल होत होते. जल विभागातील अधिकारी गणेश सातपुते आणि पालिका कर्मचाऱ्यांनीही तातडीने कामकाजास सुरुवात करत जलवाहिनीतील बिघाड सोडविला.