मुंबई, (निसार अली) : कांदिवली पश्चिम येथे 15 वर्षीय अल्पवयीन तरुणीचा विनयभंग करणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केली. शनिवार दिनांक 23 डिसेंबर रोजी रात्री 9.30 च्या सुमारास ही घटना घडली. बादल उर्फ नवीन सिंध असे आरोपीचे नाव आहे.
पीडित मुलगी दुकानात गेली असता बादल तेथे आला आणि त्याने तिचा विनयभंग केला. अचानक घडलेल्या घटनेने ती घाबरली. घरी जाऊन कुटुंबियांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. यानंतर तीच्या पालकांनी कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक नीता काळे यांनी गुन्ह्याची नोंद केली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेनंतर फरार झालेल्या आरोपी बादलला एका तासात बेड्या ठोकल्या. भा. द. वि च्या कलम 354 व पोस्को कलम8, 12 नुसार गुन्हा नोंद झाला आहे.