नवी दिल्ली : वायव्य आणि बंगालच्या उपसागरातील पश्चिम-मध्य क्षेत्रालगत तसेच ओदिशाच्या किनारी भागालगत निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा सध्या गोपालपूरच्या पूर्व-दक्षिणपूर्व दिशेवर १२० किमी अंतरावर तर पुरीच्या दक्षिणऱ्दक्षिण पूर्व दिशेवर ८० किमी अंतरावर आहे. कमी दाबाचा पट्टा पश्चिम-उत्तर पश्चिम दिशेने वाटचाल करण्याची शक्यता असून तो आज रात्रीपर्यंत गोपाळपूर आणि पुरीमधून ओदिशा किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे येत्या ४८ तासात दक्षिण ओदिशात तर येत्या २४ तासात आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारी भागात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. छत्तीसगडमध्येही येत्या २४ तासात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. तेलंगणा, ओदिशाचा उत्तर भाग आणि मध्य प्रदेशातही येत्या ४८ तासात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.