मुंबई: कमला मिल कंपाउंड आगप्रकरणी कारणीभूत असलेल्या दोघांना मुंबई पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. ‘वन अबव्ह’ या पबचे फरार मालक जिगर संघवी आणि कृपेश संघवी यांना अटक केली आहे. घटना घडल्यापासून दोघे फरार होते.
२८ डिसेंबरला दुर्घटना घडली. यात ह१४ बळी गेला होता. याआधी पोलिसांनी वन अबव्ह पबचा भागीदार अभिजित मानकर याला फरारी होण्यास मदत करणाऱ्या विशाल कारिया याला अटक केली होती. बुधवारी त्याला भोईवाडा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी भोईवाडा न्यायालयाने कारियाला १७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली. तसेच पोलिसांनी अटक केलेले वन अबव्हचे व्यवस्थापक केविन बावा आणि लिस्बन लोपेज या दोघांची भोईवाडा न्यायालयाने २२ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली, तर ‘मोजो बिस्ट्रो’चा मालक युग पाठक याला न्यायालयाने १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.