डोंबिवली (प्रशांत जोशी) : कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन माध्यमातून अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी सहा आठवड्यांचा औद्योगिक प्रशिक्षण अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला. सदर अभ्यासक्रम सुरू पूर्णपणे विनामूल्य आहे. या प्रशिक्षण कालावधीत ते संस्थेची रचना, आंतरविभागीय कार्यपद्धती, सदर प्रक्रियेत वापरल्या जाणार्या विविध उत्पादन प्रक्रिया, साधने, उपकरणे, यंत्रसामग्री यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येईल अशी माहिती कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी सांगितले.
सदर अभ्यासक्रमाचा पहिला दिवस उपस्थित विद्यार्थी आणि कामाचे अध्यक्ष देवेन सोनी पदाधिकारी, उदय वालावलकर, विनायक लोंढे, जयवंत सावंत, राजू बैरुल मार्गदर्शक रत्नाकर नातू, वृंदा सावंत यांच्या परिचयाद्वारे झाली. या उपक्रमातुन विद्यार्थी औद्योगिक तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग, संस्थेसाठी उपयुक्त प्रकल्प कार्य देखील करतील. उमेदवारामध्ये व्यावसायिक वृत्ती विकसित करणे हे अंतिम उद्दिष्ट या उपक्रमाच्या माध्यमातून असून जेणेकरून विद्यार्थी औद्योगिक विषयातील एकूण कार्यपद्धती विकसित करण्यासाठी अधिक योग्य असेल. सोमवारी पहिल्या बॅचचा पहिला दिवस होता आणि या कोर्ससाठी 100 विद्यार्थ्यांनी आपली नावे नोंदवली आहेत.
या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट औद्योगिक उत्पादन आणि औद्योगिक सुरक्षेमध्ये व्यावहारिक उत्तेजन देऊन कौशल्य विकास व्हावा असा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उद्योगांमध्ये काय करावे आणि काय करू नये याबद्दलची जागरूक निश्चित येईल असेही देवेन सोनी यांनी या उपक्रमाबद्दल सांगितले.