
डोंबिवली, (प्रशांत जोशी) : भाजप कल्याण ग्रामीण तर्फे आज दरवर्षीप्रमाणे भव्यदिव्य रक्षाबंधनाचे उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात तब्बल बारा हजार महिलांनी सहभागी झाल्या होत्या. तसेच या महिलांनी आपल्या भावाना राख्या बांधल्या. त्याच प्रमाणे स्थानिक नगरसेविका रविना माळी यांनी मानपाडा पोलीस स्टेशन मधील पोलिसांना आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना राखी बांधून शुभेच्छा दिल्या.या भव्यदिव्य कार्यक्ररमात भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेजी यांना श्रद्धांजली वाहून यंदा या उत्सवाचे नाव अटलबंधन असे ठेवण्यात आले.
यावेळी सर्व महिलांना माळी बंधूंतर्फे रक्षाबंधनाची भेट म्हणून प्रत्येकी स्टीलची भांडी , धान्य व साडी अशी भेट देण्यात आली. भोपर, देसलेपाडा, लोढा हेरिटेज या परिसरातील तब्बल बारा हजार महिलांची उपस्थित उल्लेखनीय होती. सदर उत्सवाला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, मानपाडा पोलीस ठाण्याचे वपोनी गजानन काब्दुले, भाजप सरचिटणीस शिवाजी आव्हाड, नगरसेविका रविना माळी, डॉ सुनीता पाटील, नगरसेवक संदीप पुराणिक, केडीएमटी सभापती सुभाष म्हस्के, राजू दीक्षित, मनोज चौधरी, मधुकर यशवंतराव, संजय राणे उपस्थित होते. सदर उत्सवाचे आयोजन कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांनी केले. अमर माळी आणि माळी बंधूंचे सहकार्य लाभले.
“गेले अनेक वर्षे भोपर, देसलेपाडा, लोढा हेरिटेज या परिसरातील महिला रक्षाबंधनसाठी या उत्सवाला येत असतात. विशेष म्हणजे घरी रक्षाबंधन सण असून सुद्धा पाहिले या उत्सवाला येतात आणि मला राख्या सुद्धा बांधतात .”
– जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी

















