
रत्नागिरी : कळझोंडी धरण धोकादायक असल्याचा अहवाल २००५ मध्येच प्राप्त झाला आहे. असे असताना आहे त्या धरणाची उंची वाढवण्याचा घाट का घातला जात आहे. वरवडेवासीयांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रयत्न आहे. कळझोंडी धणाची उंची वाढवून आमचे तिवरे गाव होऊ देणार नाही. तसे करण्याचा प्रयत्न केल्यास वरवडेवासीय शेवटपर्यंत लढा देतील असा निर्धार रविवारी झालेल्या ग्रामसभेत करण्यात आला.
कळझोंडी धरणाची उंची वाढण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. धरणाची उंची वाढवण्याला वरवडेवासीयांना ठाम विरोध केला आहे. यासाठी रविवारी वरवडे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेला सरपंच निखिल बोरकर, शरद बोरकर, बाबू पाटील, समीर बोरकर यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
जयगड परिसरात सात गावात उद्भवणाºया पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कळझोंडी येथे ४० वर्षांपुर्वी धरण बांधले गेले. या पाण्यावर वरवडे गावच्या शेती, बागायती तर पिण्यासाठी पाण्यासाठी उपयोग केला जातो. वरवडे गावाने धरणासाठी लोक वर्गणी भरली होती. या धरणाच्या भिंती तसेच सर्व साधन सामुग्रीची आयुष्य मर्यादा संपली आहे असे सांगुन धरणाला जॅकेटींग करून त्याची उंची वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परंतु, धरणाची उंची वाढवणे अन्यायकारक आहे. सुमारे ४० वर्षे जुन्या भिंतीवर उंची वाढवली जात आहे. धरणाची भिंत लिकेज असल्याने वाहून जाणारे पाणी परत धरणात टाकण्यासाठी १५ हॉर्स पॉवर पंप लावण्यात येतो. धरण हे नादुरुस्त आहे, पण ज्या लोकसंख्येसाठी हे धरण बांधण्यात आले त्यापेक्षा अधिक लोकांना पाणी पुरवठा करायचा असल्यास परिसरात अनेक गावातून नद्या वाहत आहेत तिथे लहान प्रकल्प बांधावेत. या परिसरात औद्योगिकरण झाल्यामुळे पाणी वापरणार्यांची संख्या वाढली आहे. त्याचा भार धरणावर आहे.
वरवडेवासीयांना हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, त्यासाठी धरण दुरुस्त करण्याची जबाबदारी प्रशासनाने टाळून नवीन धरण बांधण्याचा जो घाट घातला आहे तो आमच्यावर लादू नये असा इशारा ग्रामस्थांनी दिला. धरण बांधल्यानंतर प्रतिमाणसी ४० लिटर पाणी देण्यात येणार आहे. आमचा विरोध नवीन योजनेला आहे. नवीन धरणामुळे पाणीपट्टी वाढते. साडेचार हजार रुपये वार्षिक पाणीपट्टी होणार आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी अशा बारा जणांना निवेदन दिले होते. पण त्यांनी लक्ष दिले नाही. आमच्या हक्कच पाणी मोफत मिळाले पाहीजे. मे महिन्यात २७ दिवस पाणी-पाणी करायची वेळ वरवडे गावावर आली.
प्रसंगी मतदानावर बहिष्कार
धरणाजवळ आमची घरे आहेत. याचा फटका आम्हाला बसू शकतो. कळझोंडी धरणाचे स्ट्रक्चरल आॅडिट झालं पाहिजे. प्लान काय आहे, धरण कसे बांधणार याबाबत जनसुनावणी लावली पाहिजे. याशिवाय आम्ही मान्यता देणार नाही. यासाठी सनदशीर मार्गाने पावले उचलण्याचा निर्धार या ग्रामसभेत करण्यात आला. प्रशासनाने पाणी बंद केलं तर आंदोलन करू. येणाºया निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकू, जनहित याचिका दाखल करू असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.















