कळंबोली : केएलई कॉमर्स अँड सायन्स कॉलेजने जल साक्षरता अभियानातंर्गत काढलेल्या रॅलीला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केएलई कॉलेज एनएसएस युनिट आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्तपणे रॅली आयोजीत केली. ‘जल ही जीवन’, ‘जल है तो कल है’, असे संदेश देणारे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी जनजागृती केली.
पदवी महाविद्यालयातील शिक्षक प्रा.मिलिंद गुरचल, प्रा.त्रुशांत वाडकर, प्रा.निशांत लिंगायत, प्रा.मोनिका रयाल, प्रा. अक्रम पठाण, प्रा.प्रमोद गायकवाड, प्रा. मृदुला नायर, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक सविता श्रीरंगनवा, सचिन मोरे आणि इतर शिक्षक यांनी रॅलीचे संचालन केले. एनएसएसच्या विद्यार्थ्यांनीही रॅली सुरळीत पार पाडण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले.